मागणीपत्र
दिनांक: १० जून २०२४
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
आम्रपाली रोपवाटिका,
यशवंत नगर,
सांगली - xxx xxx
ई-मेल : amrapati06@gmail.com
विषय: वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत.
महोदय,
मी मधुर कुलकर्णी, 'ज्ञानदीप विद्यालयात शिकत असून विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मा. मुख्याध्यापकांच्या परवानगीने रोपांची मागणी करण्यासाठी हे पत्र लिहित आहे. १० जून या "जागतिक पर्यावरण दिना"चे औचित्य साधून आमच्या शाळेत पर्यावरण पंधरवडा साजरा केला जाणार आहे. यातील एक उपक्रम म्हणून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवत आहोत. आपण आपल्या रोपटिकातून शाळेला फळे, फुले आणि उपयुक्त झाडांच्या रोपांचे माफक दरात वाटप १५ जून ते २० जूनदरम्यान करणार आहात. आपण तशी जाहिरात केली आहे. वृक्षारोपणासाठी आमच्या शाळेलाही काही रोपे हवी आहेत. 'मी आम्हांला ५ ते १० जुन दरम्यान मिळतील का?' जास्तीत जास्त रोपे घेऊन संवर्धन करण्याचा बक्षीस या उपक्रमातही आम्ही सहभागी होऊ इच्छितो. यादी लोड घ्यावी. रोपे घेण्यासाठी प्रतिनिधीला तेथे यावे लागेल का? आपण शाळेच्या पत्त्यावर पाठवू शकाल, याबाबत कळवल्यास सोयीचे होईल. रोपांची वाढ फुले दिली आहे.
रोपांची यादी पुढीलप्रमाणे:
अनु. क्र. | रोपाचे प्रकार | संख्या |
१. | विविध फुलझाडे | २५ |
२. | विविध फळझाडे | २५ |
३. | विविध औषधी रोपे | २५ |
४. | अशोक | २५ |
५. | निलगिरी | २५ |