अभिनंदन पत्र
दिनांक : २२ जून २०२४
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
आम्रपाली रोपटिका,
यशवंतनगर,
सांगली - xxx xxx.
ई-मेल : amrapati06@gmail.com
महोदय,
मी मधुर कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहीत आहे.
सर्वप्रथम आमच्या शाळेतर्फे तुमचे मनापासून अभिनंदन करतो. शाळा-शाळांमधून वृक्षारोपण कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या 'आम्रपाली रोपटिका'मार्फत दि. १५ जून ते २० जूनदरम्यान मोफत रोपांचे वाटप केले गेले. हा खरोखरच स्तुत्य उपक्रम होता.
वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाच्या जबाबदारीची जाणीव रहावी म्हणून तुम्ही बक्षीससाठी जाहीर केले होते. त्यामुळे जास्तीत जास्त शाळांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. आमच्या शाळेतही अधिक उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. लावलेल्या रोपांची विद्यार्थी काळजीही घेत आहेत. पर्यावरण रक्षणाच्या कर्तव्याची जाणीव करून देत नवीन पिढीला निसर्गाशी जोडण्याची कल्पना वाखाणण्याजोगी आहे. यायोगे आपण एक पर्यावरण चळवळच राबवलीत.
या सर्व गोष्टींसाठी आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन !
आपली नम्र,
मधुरा कुलकर्णी,
(विद्यार्थी प्रतिनिधी)
ज्ञानदीप विद्यालय,
सांगली - xxxxxx
ई मेल : *****@xxx.com