Search This Blog

Welcome to Study247Ca !

Monday, 19 October 2026

वृक्षारोपण : मागणी पत्र आणि तक्रार पत्र study247ca khan sir

मार्गदर्शक: श्री. इमरान खान सर. इयत्ता ९ वी - उपयोजित लेखन: पत्रलेखन (वृक्षारोपण महोत्सव)

PM श्री न. प. राजेंद्र हायस्कूल, खापा

मार्गदर्शक इमरान खान सर डिजिटल मराठी अभ्यासक्रम | उपयोजित लेखन: पत्रलेखन (इयत्ता ९ वी)

प्रश्न. पुढील फलक वाचा आणि सूचनेनुसार कृती करा :
पंडितराव देशमुख विद्यालय
संभाजी पेठ, बारामती
सहर्ष साजरा करीत आहे
वृक्षारोपण महोत्सव
१ जुलै ते १५ जुलै
१. मागणी पत्र
दिनांक : १६ जून, २०xx
प्रति,
मा. वनअधिकारी,
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय उद्यान,
पुणे - ४xx xxx.
विषय : वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करणेबाबत.
महोदय,
जुलै महिन्यात शासनातर्फे साजरा करण्यात येणारा वनमहोत्सव आमच्याही शाळेत साजरा केला जाणार आहे. या महोत्सवासाठी शाळांना आपल्या खात्याकडून वृक्षांची रोपे विनामूल्य पुरवली जाणार आहेत, असे कळाले. आमच्या शाळेलाही अशी रोपे हवी आहेत. १ जुलै ते १५ जुलैच्या दरम्यान हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी आमच्या शाळेला सुमारे दोनशे रोपे हवी आहेत, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वृक्षांची रोपे आम्ही निवडू.

हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहीत आहे.
तसदीबद्दल क्षमस्व.
आपला कृपाभिलाषी,
विजय साबळे
(विद्यार्थी प्रतिनिधी)
पंडितराव देशमुख विद्यालय,
संभाजी पेठ, बारामती - ४xx xxx.
जिल्हा - पुणे.
ई-मेल : vijays@xxxx.com
किंवा
२. तक्रार पत्र
दिनांक : ४ जुलै, २०२२
प्रति,
मा. वनअधिकारी,
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय उद्यान,
पुणे - ४११ ०१२.
विषय : सदोष रोपांच्या पुरवठ्याबद्दल तक्रार.
महोदय,
आपल्या राष्ट्रीय उद्यानातून ३० जून २०२२ रोजी आमच्या शाळेच्या मागणीप्रमाणे आपण २०० रोपांचा पुरवठा केला होता. परंतु शाळेत रोपे आणल्यावर पुढील गोष्टी आमच्या लक्षात आल्या :
  1. काही रोपांची मुळे सुकलेली होती.
  2. काही रोपांना किडींचा प्रादुर्भाव झाला होता.
  3. काही रोपे लावल्यानंतर दोन-तीन दिवसांतच सुकून गेली.
या सदोष रोपांमुळे दोनशे रोपे लावण्याचा आमचा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. आपण या गोष्टीची दखल घ्यावी. तसेच भविष्यात आम्हाला लागवडीसाठी योग्य रोपे उपलब्ध करून द्यावीत, ही विनंती.
आपली कृपाभिलाषी,
विनिता साबळे
(विद्यार्थी प्रतिनिधी)
पंडितराव देशमुख विद्यालय,
संभाजी पेठ, बारामती - ४१३ १०२.
जिल्हा - पुणे.
ई-मेल : svinita@xxxx.com